आमच्याबद्दल

जय जोती जय क्रांती जय सावता.

नमस्कार, मी प्रविण बोचरे. मागील 20 वर्षांपासून मी सामाजिक कार्यात सक्रिय आहे, आणि या अनुभवातूनच माझ्या मनात एक विचार आला. या धकाधकीच्या जीवनात विवाह जुळवणे हे एक मोठं आव्हान बनलं आहे. महाराष्ट्रभर माळी समाजाच्या वधू-वर परिचय मेळावे आयोजित केले जातात, पण सर्वांना प्रत्यक्षात उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही, तंत्रज्ञानाच्या युगात, महाराष्ट्रात पहिल्यांदा माळी समाजाचा ऑनलाईन मेळावा आयोजित करीत आहोत.

आमचा उद्देश एकदम स्पष्ट आहे – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वधू-वरांचे परिचय एका पेक्षा जास्त दिवशी ऑनलाईन माध्यमातून घडवणे. यामुळे फक्त नवरा-नवरींचा परिचय होणार नाही, तर ही सोय आपल्या सर्व नातेवाईकांनाही YouTube च्या माध्यमातून जगभर कुठेही बसून पाहता येईल. वेबसाईटच्या माध्यमातूनही स्थळांची माहिती घेता येईल, जेणेकरून हा अनुभव आणखी सुलभ होईल.

हा उपक्रम पूर्णपणे ना नफा ना तोटा तत्त्वावर आधारित आहे. तंत्रज्ञान वापराचा खर्च भागविण्यासाठी आम्ही केवळ 100 रुपये नोंदणी शुल्क ठेवलं आहे, जेणेकरून सर्वांना परवडू शकेल.

आपले सहकार्य आणि पाठिंबा नेहमीच आवश्यक आहे. चला तर मग, या तंत्रज्ञानाच्या प्रवाहात सामील व्हा आणि आपला विवाह सोहळा आणखी खास बनवा.

धन्यवाद!

संपर्क

प्रविण बोचरे

खामगाव, जिल्हा - बुलढाणा, महाराष्ट्र

मोबाईल नं.: 9604295891

ईमेल: malivivahbandh@gmail.com

YouTube: माळी विवाह बंध YouTube चॅनल